shopify visitor statistics
 
Breaking News in Marathi Film Industry,Latest New Release Marathi Movies,Upcoming Marathi Movies List

अजय फणसेकर दिग्दर्शित चीटर सिनेमाचा ट्रेलर लॉन्च!! "चीटर" १३ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात!!Gossip Title:
अजय फणसेकर दिग्दर्शित चीटर सिनेमाचा ट्रेलर लॉन्च!! "चीटर" १३ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात!!
Content:

मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केलेले दिग्दर्शक, अभिनेते अजय फणसेकर पुन्हा एकदा एक आगळा वेगळा विषय घेऊन "चीटर" या सिनेमाच्या माध्यमातून भेटीला येणार आहेत. 
अजय फणसेकर  दिग्दर्शित स्वीस एन्टरटेनमेंट प्रा, लि. च्या. फुरखान खान, प्रदीप शर्मा यांची प्रस्तुती असलेला,  निर्माते प्रविणकुमार उदयलाल जैन यांची निर्मिती असलेल्या "चीटर" सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा सिनेमातील अभिनेता वैभव तत्ववादी, अभिनेत्री पूजा सावंत, ऋषिकेश जोशी, सुहास जोशी,वृषाली चव्हाण जीवन कालारकर संगीतकार अभिजित नार्वेकर, गीतकार अखिल जोशी, गायक अवधूत गुप्ते, गायिका आनंदी जोशी आणि तंत्रज्ञ मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात झाला.

पुण्यातील अग्निहोत्री ह्या सुसंकृत घराण्यातील अभय अग्निहोत्री हा मुलगा चीटींग करीत असतो, घराण्यामधील वातावरणाच्या अगदी विरुद्ध त्याचे सारे काम सूरू असते. मॉरिशियस येथे बॉब साटम हे गृहस्थ आपल्या कुटूंबामधील सदस्या बरोबर तेथे रहात असतात, साटम हे मोठे उद्योगपती असून ते  स्वतः खूप वर्षापूर्वीचा एक मोठा व्हिला विकत घेतात.  त्यांच्या आईची इच्छा असते की आपल्या नातीने मराठी संस्कृती जाणुन घेतली पाहिजे त्यासाठी तिचे पुण्यात तिला म्हणजे मृदुला ला शिकण्यासाठी पुण्यात पाठवितात, मुदुलाची अभय बरोबर ओळख होते, आणि दोघे प्रेमात पडतात, अभय तिच्याबरोबर सुद्धा चीटींग करीत असतो, त्यानंतर अशी काही घटना घडते की त्या घटने नंतर त्याला मॉरिशियसला जावे लागते. त्याच्या या चीटींग करण्याच्या स्वभावामुळे तो स्वतःच कधी जाळ्यात अडकतो की. ...?? हे जाणून  घेण्यासाठी आपल्याला "चीटर " हा सिनेमा पहावा लागणार आहे

"चीटर"च्या ट्रेलरचे प्रकाशन मोठया शानदार पद्धतीने साजरे झाले त्यावेळी दिग्दर्शक अजय फणसेकरांनी  सांगितले की, ह्या चित्रपटाचे ८० टक्के चित्रिकरण हे मॉरिशियस येथे झालेले आहे, ह्या सिनेमातील कलाकार आणि निर्माते यांचे संपूर्ण सहकार्य मला खूप मिळाले, तेथे चित्रिकरण करताना नैसर्गिक अडचणी आल्या त्यावर मात करून आम्ही सर्वांच्या सहकार्याने पूर्ण केले, खरतर आजवर केलेल्या माझ्या सिनेमांपेक्षा ह्या सिनेमाचा जॉनर हा पूर्णपणे वेगळा असून मी पहिल्यांदाच हाताळला आहे आणि प्रेक्षकांना नक्कीच पसंतीस उतरेल अशी मला आशा आहे.

अभिनेता वैभव तत्ववादी यांनी सांगितले की, ह्या सिनेमात अभय अग्निहोत्री ही भूमिका मी साकारलेली  आहे, ह्या मुलाला एकच गोष्ठ माहित असते ती म्हणजे फक्त खोटे बोलणे, खोटे बोलणे, आणि खोटे बोलणे त्यामुळे आजवर न पाहिलेल्या विविध छटा ह्या माझ्या भूमिकेत तुम्हाला दिसतील. 

पूजा सावंत हिने आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की माझ्या भूमिकेचे नाव " मृदुला " आहे पण मला " मिमो " म्हणतात, मी आणि वैभव ने बरेच दिवसानंतर एकत्र काम केले आहे, एका वेगळ्या पद्धतीची भूमिका असून काम करताना खूप आनंद झाला.

ह्या सिनेमात चार गाणी असून वेगवेगळ्या मूडची गाणी आहेत, सिनेमातील दोन गाणी सुप्रसिद्ध गायक 
सोनू निगम आणि आनंदी जोशी यांच्या सुमधुर आवाजात रेकॉर्ड करण्यात आली आहेत. सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी या सिनेमाचे शीर्षक गीत गायले आहे त्याशिवाय उर्मिला धनगर च्या आवाजातील " झाकरी " नृत्यावर आधारित एक गीत हे या सिनेमाचा आकर्षणाचा भाग आहे. 
"चीटर" या  सिनेमाचे छायाचित्रण बी. लक्ष्मण यांचे  असून संगीत नव्या दमाच्या अभिजीत नार्वेकर या  तरुणाने दिले असून सिनेमातील गाणी ही अखिल जोशी या नवोदित तरुणाने लिहिली आहेत. व्ही,एफ,एक्स्चे काम हे या सिनेमातील मुख्य असून  हेमंत शिंदेने हे  शिवधनुष्य उत्तमरीत्या पेलले आहे.  
सिनेमाचे संकलन विनोद पाठक, कला दिग्दर्शन स्वप्नील केणी, नृत्ये वृषाली चव्हाण, अमित बाईंग  आणि कार्यकारी निर्माते समीर शेख हे आहेत.

चीटर हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा १३ मे रोजी आपल्या भेटीला येत आहे.NOW SHOWING