shopify visitor statistics
 

New Movie releases कृष्णाजी एक योद्धा चित्रपटाचा मुहूर्त संपन्नMovieposter Title:
कृष्णाजी एक योद्धा चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

Release Date:
0000-00-00

Content:

मराठी चित्रपटांच्या बदलत्या परिभाषेने रुपेरी पडदा अधिक विस्तारु लागला आहे. या रुपेरी पडद्यावर वैविध्यपूर्ण चित्रपटांची प्रभावी निर्मिती सातत्याने होत आहे. ऐतिहासिक तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील महान व्यक्तिरेखांवर बेतलेले सिनेमे अलीकडच्या काळात आले आणि त्याला उदंड लोकाश्रयही मिळाला. याच यादीत आणखी एका चित्रपटाचा आपल्याला उल्लेख करावा लागणार आहे. कृष्णाजी एक योद्धा हा इतिहासाचा आणखी एक ज्वलंत तरीही काहीसा दुर्लक्षितअध्याय आता मराठी रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे.

 

जे.जे क्रिएशन्सची प्रस्तुती असलेल्या कृष्णाजी एक योद्धा या सिनेमाचा मुहूर्त नुकताच शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला. अनंत सामंत यांच्या 'लिलियनची बखर' या कादंबरीवर आधारित या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शन 'चॉक अॅण्ड डस्टर' फेम जयंत गिलाटर हे करणार आहेत. इंग्रजव मराठे यांच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर घडलेली रोमांचकारी प्रेमकथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. जे. जे क्रिएशन्सने याअगोदर 'सदरक्षणाय' आणि'रणभूमी' या सिनेमांची प्रस्तुती केली आहे.

 

कृष्णाजी या महान व कर्तृत्ववान व्यक्तिरेखेच शिवधनुष्य डॉ अमोल कोल्हे यांनी उचलले आहे. एक आगळा ऐतिहासिकपट कृष्णाजी एक योद्धा या चित्रपटाच्यानिमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर साकारला जाणार असल्याचा आनंद डॉ अमोल कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.

 

चित्रपटाचा कथा विस्तार व पटकथा डॉ अमोल कोल्हे, जयंत गिलाटर, शुभेंद्र पाल यांची आहे. संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन निर्मल जानी करणार असून साहसी दृश्ये रवी दिवाण साकारणार आहेत.NOW SHOWING